पिंपळगाव बसवंत : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाट्यावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी महिलांसाठी आयोजित स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.पिंपळगाव बसवंत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या बाहेर युवासेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याशिवाय प्रमिला लॉन्स येथे आयोजित महिलांसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराला भेट देऊन त्यांनी संवाद साधला. महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवा सेना व शिवसेनेच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी खास मुंबईतील प्रशिक्षणांची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वरुण सरदेसाई, राज्यमंत्री दादा भुसे, भाऊ चौधरी,भाऊलाल तांबडे, सुधीर कराड, गिरीश विचारे, भास्करराव बनकर, राजेश पाटील, सुजित मोरे, गोटू बागुल, नीलेश पाटील, सुनील बैरागी, बाळासाहैब दुसाणे आदींसह मुंबईचे प्रशिक्षक मेहुल वोरा, जास्मिन मकवाना, संजय दरेकर, विपुल सुई आदी उपस्थित होते.पुढील आमदार शिवसेनेचाचनांदगाव : आमदाराला तालुक्यातील जनता ओळखत नाही, ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी पुढील आमदार शिवसेनेचाच राहील, यासाठी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. सध्या युवासेनेच्या वतीने राज्यभर महिलांसाठी स्व-संरक्षणाची मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत नांदगाव दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी प्रशिक्षणाचा मुख्य कार्यक्र म आटोपल्यावर एका छोटेखानी कार्यक्र मात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यक्र माचे प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, युवा नेते वरु ण देसाई, आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, आमदार नरेंद्र दराडे, पंचायत समितीच्या सभापती विद्यादेवी पाटील, नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडच्या नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, विलास आहेर,तेज कवडे, माजी सुभाष कुटे, किरण देवरे, जाधव आदी उपस्थित होते.
महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:33 AM
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाट्यावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी महिलांसाठी आयोजित स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
ठळक मुद्देआदित्य ठाकरे : पिंपळगाव, नांदगावी प्रशिक्षणाला उपस्थिती