पंचवटी : शिवसेना पंचवटी विभागाचे माजी उपविभागप्रमुख उमेश काशिनाथ नाईक (३७) यांनी शुक्रवारी (दि. ७) दुपारी नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाईक यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी आर्थिक प्रश्नांमुळे त्यांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा आहे.
नागचौक येथील जुन्या घराला रंगकाम करायचे असल्याने तिकडे चाललो असल्याचे पत्नीला सांगून उमेश नाईक शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिर परिसरात असलेल्या नव्या घरातून बाहेर पडले होते. मात्र दुपारनंतर ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. त्यांनी फोनही उचलला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या जुन्या घराकडे धाव घेत दरवाजा वाजविला. परंतु, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर घराचा दरवाजा तोडला असता नाईक यांनी घरात स्लॅबच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. नाईक यांनी आत्महत्या का केली याचे कारण शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र आर्थिक वादातून नाईक यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
===Photopath===
070521\07nsk_34_07052021_13.jpg
===Caption===
उमेश नाईक