चांदवड : तालुक्यात सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर सुरु करु नये अन्यथा शिवसेनेला हा प्रश्न नाईलाजाने हातात घ्यावा लागेला असा इशारा चांदवड तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष शांताराम ठाकरे ,चंद्रकांत देवरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संपतराव भाऊसाहेब वक्ते, साहेबराव गुंजाळ, दीपक भोयटे, गोरख साहेबराव हिरे आदिच्या शिष्टमंडळाने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे. डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर हे चांदवड येथे सुरु करणार असल्याची माहिती लोकमत मध्ये वाचुन आश्चर्य वाटले. प्रशासनाने स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर हा निर्णय घेतला. तसेच कोविड -१९ च्या सुरुवातीलाच चांदवड परिसरात एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडला त्यानंतर तीन ते चार रुग्ण परिसरात मिळून आले.
कोविड सेंटरला शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:57 PM