शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथे झालेल्या शिवसेनेच्या गटस्तरीय मेळाव्यात गटनिहाय पक्षाच्या कामकाजाचा व आगामी नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. आजी-माजी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून निवडणुकांना सामोरे जावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांनी शिवसेनेच्या प्रयत्नातून पेठ पंचायत समिती कार्यालय नूतन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले.
यावेळी तालुकाप्रमुख भास्कर गावित, सभापती विलास आलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, तुळशीराम वाघमारे, भागवत पाटील शहर प्रमुख गणेश शिरसाट, सुरेश पवार, किरण भुसारे, पुंडलिक महाले, पद्माकर कामडी, यादव भोये, जगदीश गावित, दिलीप भोये, मनोहर चौधरी, मनोहर मोढे, ललित शिंगाडे, भरत पवार, तुळशीदास इंपाळ आदीसह शिवसैनिक उपस्थितीत होते.
पेठ येथे शिवसेना मेळावाप्रसंगी सुनील पाटील, भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे, मोहन कामडी, तुळशीराम वाघमारे आदी. (०१ पेठ २)
010721\01nsk_17_01072021_13.jpg
०१ पेठ २