शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

शिवसेनेचे नीलेश कुलकर्णींसह दोन ठार

By admin | Published: January 05, 2017 1:32 AM

नांदगाव येथे अपघात : नाशिकचे चौघे जखमी

 नांदगाव : औरंगाबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेचे निमित्त होऊन पलटी झालेल्या अपघातात नाशिक शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी व डॉ. संदीप येवलेकर हे दोघे जागीच ठार झाले. इतर चार जण जखमी झाले.अ‍ॅड. कुलकर्णी हे आपल्या मित्रांसमवेत लासलगाव येथील हितेश पवार याच्या साखरपुड्यासाठी औरंगाबाद येथे गेले होते, तेथून परतत असताना हा गंभीर अपघात घडला. मंगळवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरवाडे व कासारीच्या दरम्यान घाटातील वळणावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या इनोव्हास समोरून येणाऱ्या वाहनाचा धक्का बसला. धक्का एवढा तीव्र होता की, इनोव्हाचे चालक अ‍ॅड. कुलकर्णी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती तीन चार पलट्या खात गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पडली. त्यामुळे अपघात झाल्याचे सुरुवातीस कोणालाही कळले नाही. नांदगाव बाजार समितीचे कापूस कर वसुली कर्मचारी दुचाकीवरून एका कापसाच्या ट्रकचा पाठलाग करत, तिथून जात असताना खड्ड्यात पडलेल्या गाडीचे लाइट चमकले म्हणून ते उतरले. तेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळली. कर्मचारी किशोर मोरे व दशरथ हराळ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींच्या मदतीने मोरे व हराळ यांनी अ‍ॅड. कुलकर्णी व हितेश पवार यांना नांदगाव येथील रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता दाखल केले. तर उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. जखमींमध्ये श्याम कांगले, हितेश पवार, दत्तप्रसाद विसपुते यांच्यासह चौघांचा समावेश आहे.अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख होते, त्याचबरोबर ब्राह्मण समाजातही सक्रिय कार्यकर्ते होते. समाजातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते दर रविवारी मार्गदर्शन सत्र आयोजित करीत. अभ्यंकर प्लाझा येथे असलेले मायबोली वाचनालयही त्यांनी चालविण्यास घेतले होते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली तसेच स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी त्यांनी दीड लाख पत्र पाठविण्याची मोहीमही घेतली होती. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यंकर प्लाझा येथे धाव घेतली. दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी नांदगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक महेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम बस्ते, राकेश चौधरी, पंकज देवकाते पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)