लासलगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जवसुली सुरू आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असताना राज्य सरकारने आदेश दिलेले असूनही जिल्हा बँक संपुर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कर्जाची मागणी करून शेतक-यांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. जिल्हा बॅँकेने तातडीने ही कर्ज वसुली थांबवावी अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार एस. बी. ढगे यांनी स्वीकारले. यावेळी ईश्वर शिंदे, रमेश चव्हाण, जगदीश पवार, संदीप पवार आदि उपस्थित होते.
जिल्हा बॅँकेच्या वसुलीला शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 6:25 PM
शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा
ठळक मुद्देनिवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार एस. बी. ढगे यांनी स्वीकारले.