यावेळी विविध राजकिय पक्षाच्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे पंचवटी कारंजा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जन्मोत्सवनिमित्त ६५ फूट उंचीचा किल्ल्याचा देखावा साकारला होता.पूर्वसंध्येला लेसर शो आयोजन केले होते. शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार ॲड.राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर भिकुबाई बागुल, शिवसेना नेते सुनील बागुल, यांच्या हस्ते शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करत ढोलताशांचा गजर करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मामा राजवाडे, उल्हास धनवटे, उपाध्यक्ष सतनाम राजपूत, दिगंबर मोगरे, करन टिळे, श्रमिक सेना जिल्हाध्यक्ष अजय बागुल, भाजयुमो अध्यक्ष शंभू बागुल, नरेश पाटील आदींसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
श्रमिक सेनेच्या वतीने मालेगाव स्टॅन्ड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ देखावा साकारण्यात आला होता. यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ढोलताशे व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. श्रमिक सेना महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळपासून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांचा गजर करण्यात आला.
आडगाव येथील आडगाव शिवजन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी रात्री पाळण्यात शिवप्रतिमा ठेऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती शितल माळोदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ॲड. नितीन माळोदे, समिती अध्यक्ष रामभाऊ जाधव, सुदाम दुशिंग, अक्षय माळोदे, गणेश शिंदे, प्रवीण हंडोरे, बालाजी माळोदे, विशाल शिंदे उपस्थित होते.
सेवाकुंज येथील सप्तशृंगी मित्रमंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष सतनाम राजपुत, शिव देशमुख, मंदार गंजीवाले, अंकुश देशमुख, अनील हिरभगत, चंद्रकांत दौडे, हर्षद पेहरकर, मयुर जाधव उपस्थित होते. यावेळी परिसरात सजावट करण्यात आली होती.
म्हसरूळला शिवराम मंदिर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापूजा करून दुग्धाभिषेक करण्यात आला.
नगरसेवक अरुण पवार, मंदिराचे व्यवस्थापक अप्पा केदार यांच्या हस्ते महापूजन करण्यात आले. यावेळी राहुल पवार,
किरण काकड, शरद ओझरकर, महेश कुलकर्णी, रवी साळुंके, गणेश जोशी, उपस्थित होते.(फोटो २० पंचवटी १)