सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात सलग पाच दिवस चाललेल्या छत्रपती शिवभारत कथेमध्ये शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. तिसºया दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला, परधर्मीय, शेती, जातिभेदरहित धोरण आणि शिवाजी महाराज व संत तुकाराम यांची भेट आदी ऐतिहासिक प्रसंग कथानकाद्वारे उभे करण्यात आले. चौथ्या दिवशी शहाजी महाराजांची अटक व सुटका, जावळीच्या खोºयातील विजय, अफजलखान वध, पन्हाळ गडावरील प्रसंग, बाजीप्रभू देशपांडेचा पराक्र म व शाहिस्तेखानावर छापा हे कथानक ऐतिहासिक पद्धतीने दाखविण्यात आले. पाचव्या दिवशी शिवरायांची सुरतेवर स्वारी, आग्राची भेट व सुटका, कोंढाण्यावर स्वारी, महाराजांचा अतुलनीय पराक्रम आणि शिवरायांचा अतुलनीय राज्याभिषेक सोहळा दाखविण्यात आला. शिवरायांचा राज्याभिषेक सुमारे ५० कलावंतांनी त्यामध्ये सहभाग घेऊन घोडे, तुतारी, तलवारी, जरीपटका, अब्दगिरी, छत्रसिंहासन, चामर या ऐतिहासिक वस्तूंच्या साहाय्याने भव्यदिव्य स्वरूपाचे शिवभारत कथाकार प्रा. राजाराम मुंगसे यांनी आपल्या अमोघ वाणीने व संगीतमय पद्धतीने सादर केले. शिवभारत कथा यशस्वीतेसाठी समन्वय समितीचे हरिभाऊ तांबे, नामदेव कोतवाल, कृष्णा कासार, विनायक सांगळे, राजाराम मुरकुटे, जयराम शिंदे, विलास भगत, स्वप्निल डुंबरे, पंकज जाधव, गौरव घरटे, अनिल कर्पे, सुभाष कुंभार, डी. डी. गोर्डे आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा व्ही. राजे गु्रपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या संकल्पनेतून शिवभारत कथेचे आयोजन करण्यात आले होते. गणेश लोखंडे यांनी उभारलेला ऐतिहासिक मंडप, संगीतकार अरु णा पगारे, गायक हर्षद गोळेसर, ऐतिहासिक देखाव्याचे सादरीकरण करणारे संजय गंगावणे, वेशभूषाकार अनिल कर्पे, संकल्प भालेराव, नीरज गुजराथी आदींनी यासाठी परिश्रम घेतले. शिवभारत कथेच्या पहिल्या दिवशी शिवपूर्वकाल, महाराष्ट्राचा सुवर्णकाल, शहाजी-जिजाऊ विवाह, खंडागळे हत्ती प्रकरण ऐतिहासिक देखाव्यासह सादर करण्यात आले. दुसºया दिवशी शिवजन्म, शिवराय बालपण, शहाजी राजांचा पराक्र म व रोहिडेश्वराची प्रतिज्ञा देखाव्यासह सादर केली.
शिवभारत कथेने शिवप्रेमी भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:11 AM
सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात सलग पाच दिवस चाललेल्या छत्रपती शिवभारत कथेमध्ये शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले.
ठळक मुद्देऐतिहासिक प्रसंग कथानकाद्वारे उभे भव्यदिव्य स्वरूपाचे शिवभारत