शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

सभापतिपदी शिवाजी गांगुर्डे

By admin | Published: April 08, 2017 1:09 AM

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड झाली आहे.

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड झाली आहे. गांगुर्डे यांनी शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रेय सूर्यवंशी यांचा दोन मतांनी पराभव केला. गांगुर्डे यांना नऊ, तर सूर्यवंशी यांना सात मते मिळाली. महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे यांनी, तर शिवसेनेकडून दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीनंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. परंतु, माघारी अर्ज न आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी शिवाजी गांगुर्डे यांच्या बाजूने भाजपाचे शशिकांत जाधव, जगदीश पाटील, मुकेश शहाणे, अलका अहिरे, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सुनीता पिंगळे व श्याम बडोदे यांनी मतदान केले, तर शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांच्या बाजूने सेनेचे सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि मनसे आघाडीचे मुशीर सय्यद यांनी मतदान केले. शिवाजी गांगुर्डे नऊ विरुद्ध सात मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.सभापतिपदी निवड झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी शहराध्यक्ष विजय साने आदि उपस्थित होते. याशिवाय, कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार व मनसेचे गटनेता सलीम शेख यांनीही गांगुर्डे यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)