नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. शिवाजी सहाणे यांना बुधवारी (दि.२) अधिकृतरीत्या उमेदवारी घोषित करण्यात आली असून, त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २१ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या उभयतांत आता सामना रंगणार आहे.अॅड. शिवाजी सहाणे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून, गेल्यावेळी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्या विरोधात लढवली होती त्यात समसमान मते झाल्याने चिठ्ठी पद्धतीने त्यांच्या विरोधात कौल गेला होता, त्यानंतर पुन्हा विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून दावेदारी करणा-या अॅड. शिवाजी सहाणे यांची अलीकडेच शिवसेनेने हकालपट्टी केली होती. शिवसेनेच्या वतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळाल्यानंतर अॅड. शहाणे यांनी नाराजी तर व्यक्त केली शिवाय स्वत:ची उमेदवारी घोषित करून भेटीगाठी सुरू केल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने स्वयंघोषित उमेदवारी केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर राष्टÑवादीच्या संपर्कात ते गेले आणि त्याचवेळी राष्टÑवादीनेदेखील त्यांना जवळ केले. बुधवारी (दि. २) सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिकमध्ये आल्यानंतर अॅड. सहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तत्काळ उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. विशेष म्हणजे अॅड. शिवाजी सहाणे यांचा अर्ज दाखल करतेवेळी सध्या राष्टÑवादीच्या वाटेवर असलेले भाजपाचे शिक्षक मतदारसंघातील आमदार डॉ. अपूर्व हिर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीत प्रवेश करताना क्षणीच शिवाजी सहाणे यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:03 PM
नाशिक विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. शिवाजी सहाणे यांना बुधवारी (दि.२) अधिकृतरीत्या उमेदवारी घोषित करण्यात आली
ठळक मुद्देअॅड. शिवाजी सहाणे यांची अलीकडेच शिवसेनेने हकालपट्टी केली होती.शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी