पंचवटी : श्रावणमासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.पहाटे चार वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत श्रावणी सोमवारनिमित्ताने रु द्राभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी मंदिरातील पुजारी अभिजित गाडे, अमोल थिटे, चिन्मय गाडे यांच्या उपस्थितीत महादेवाच्या पिंडीची पूजा करून अभिषेक व महाआरती करण्यात येईल. मुख्य मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी श्री कपालेश्वर मंदिरातून चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणूक मालवीय चौक, शनि चौक, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, साईबाबा मंदिरमार्गे काढण्यात येऊन रामकुंडावर विधिवत पूजन करण्यात येईल. येथे आरती झाल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरती करून पालखीचा समारोप होईल. कपालेश्वर देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, तर मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट करण्यात आली.
श्रावणमासानिमित्त शिवमंदिरे सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:25 AM
श्रावणमासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देश्री कपालेश्वर महादेव मंदिरात कार्यक्र म