नाशिक : सध्याच्या युवकांकडून कर्तृत्व गाजवणे तर दूरच, या महापरुषांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती असते. त्यामुळे तरुणाईला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर नव्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ७१ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. निर्मिक फाउंडेशनतर्फे व्याख्यानात प्रा. गोसावी यांनी ‘महात्मा फुलेंचा संघर्ष आणि बहुजनांची आजची वाटचाल’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, शूद्रांना दिल्या जाणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीमुळे जोतिराव फुले विचार करू लागले व पुढे त्यांनी सामाजिक चळवळीत स्वत:ला झोकून दिले. निर्मिक फाउंडेशनचे प्रतिनिधी अंबादास शेळके विचार मंचावर उपस्थित होते.व्याख्यानमालेच्या प्रतिनिधी अलका एकबोटे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब खरोटे यांनी निर्मिक संस्थेची माहिती दिली. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अमित जोजारे यांनी प्रश्नोत्तर सत्राचे संचालन केले, तर गणेश आमले यांनी आभार मानले.अभ्यासक्रमात संधिान नाहीमहात्मा फुलेंच्या घराचा क्र मांक ३९५ असल्याने डॉ. आंबेडकरांनी संविधानात ३९५ कलमे लिहून एकप्रकारे त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या अभ्यासक्रमात संविधान कधीच शिकवले गेले नाही. ‘संविधान’ आणि ‘राज्यघटना’ एकच असल्याचेही तरुणाईला समजत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवराय, फुले, आंबेडकर पुन्हा समजावण्याची गरज : यशवंत गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:40 AM