नाशिक : राज्यातील शिवभोजन थाळीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. "ब्रेक द चेन" च्या प्रक्रियेंतर्गत काही निर्बंध अजूनही कायम असल्यामुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मोफत थाळीला मुदतवाढ देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील जनतेला थाळी मोफत मिळणार आहे. जिल्ह्यात ५३ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. शहरी भागात त्यामधील अधिक केंद्रे असून काही ग्रामीण भागात आहेत. बसस्थानके, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालये, बाजार समिती येथे केंद्रे सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे.
शिवभोजन थाळी सप्टेंबरपर्यंत मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 1:37 AM