देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला.भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. देवगांव परिसरात देवगांवसह वावीहर्ष, चंद्राचीमेट येथील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच राजू कौले, उपसरपंच रोशन वारे, प्रा. तुकाराम रोकडे, अशोक दोंदे, पोपट रोकडे, दिलीप कौले, अभंग रोकडे, ग्रामविकास अधिकारी किसन राठोड आदी उपस्थित होते. चंद्राचीमेट येथे भगवान देहाडे, राजेंद्र चंद्रे, अशोक चंद्रे, उपसरपंच बी. एस. पवार, विस्तार अधिकारी भाऊ खादे, ग्रामविकास अधिकारी जे. पी. केदारे, वंदना कोरडे आदी उपस्थित होते. वावीहर्ष कार्यालयातील कार्यक्रमप्रसंगी सरपंच बाबुराव बांगारे, उपसरपंच प्रशांत कर्डक, सदस्य काळू रौंदळे, काळुबाई पुंजारे, तुळशिराम पुंजारे ग्रामपंचायत शिपाई व ग्रामस्थ उपस्थित होते.
देवगांव ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 11:38 PM
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देराष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता