सर्वतिर्थ टाकेद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शासकीय नियमानुसार, शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालत सामाजिक अंतर राखत साजरा करण्यात आला.इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु. याठिकाणी ६ जून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता सरपंच ताराबाई बांबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवा ध्वज फडकाऊन गुढी उभारण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच रामचंद्र परदेशी, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य लता लहामटे, नंदाबाई शिंदे, विक्रम भांगे, शिवाजी भामरे, कैलास भवारी, राम शिंदे, दौलत बांबळे, जगण घोडे, सोनू धादवड, शांताराम भांगे, अविनाश परदेशी, सागर दवंडे, सतीश जाधव, किशोर पवार आदी उपस्थित होते.
टाकेद ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 10:37 PM
सर्वतिर्थ टाकेद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शासकीय नियमानुसार, शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालत सामाजिक अंतर राखत साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवा ध्वज फडकाऊन गुढी उभारण्यात आली.