शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

शिवसेनेची भाजपाविरुद्ध तक्रार

By admin | Published: February 16, 2017 1:38 AM

चित्रफीत प्रकरण : चौकशी करण्याची मागणी

नाशिक : उमेदवारांकडून एबी फॉर्मच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या या कारनाम्याविरुद्ध आता कॉँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता सदर चित्रफितीवरून सेना-भाजपातही राजकीय फड रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने तिकीट देताना उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याची व्हिडीओ क्लीप सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सदर व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कॉँग्रेसने त्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आयोगाच्या पथकाने चौकशी करत भाजपाच्या सर्व ११९ उमेदवारांना नोटिसा बजावतानाच शहराध्यक्षांकडूनही खुलासा मागविला आहे. चित्रफितीचे प्रकरण चौकशीच्या स्तरावर असतानाच आता या वादात भाजपाविरुद्ध शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चासाठी स्वतंत्र बॅँक खाते उघडण्याचे बंधनकारक केले आहे. त्या खात्यात पैसे जमा करून खर्चाचा तपशील आयोगाला सादर करायचा आहे. असे असताना भाजपाने उमेदवारांकडून प्रचारासाठी खर्च म्हणून २ लाख रुपयांची मागणी केलेली आहे.