नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. विशेषत: धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटन करणाऱ्यांना महामंडळाकडून नैमित्तिक कराराने बसेस दिल्या जातात. लाल-पिवळ्या गाड्यांच्या या परंपरेत आता शिवशाहीचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. सामूहिक बुकिंग केले तर प्रवाशांना आता वातानुकूलित शिवशाही बसेसदेखील मिळणार आहेत.लग्नसोहळा, पिकनिक, देवस्थानला जाणारे भाविक अशा सर्व घटकांना समूहाने बुकिंग योजनेंतर्गत शिवशाही बसेस देण्यात येणार आहे. यापूर्वी शिवशाही बसेस केवळ मोठ्या शहरांना जोडणाºया मार्गावरच धावत होत्या, परंतु आता हा संकेत मोडून काढत राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे. पंढरपूर यात्रेसाठी अशाप्रकारची योजना प्राधान्याने राबविली जाते. दिवाळी सुट्टीच्या काळातदेखील गु्रप बुकिंगसाठी प्राधान्य दिले जाते.
शिवशाही बसेसही मिळणार आता ‘पॅकेज टुर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:39 PM
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. विशेषत: धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटन करणाऱ्यांना महामंडळाकडून नैमित्तिक कराराने बसेस दिल्या जातात. लाल-पिवळ्या गाड्यांच्या या परंपरेत आता शिवशाहीचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. सामूहिक बुकिंग केले तर प्रवाशांना आता वातानुकूलित शिवशाही बसेसदेखील मिळणार आहेत.
ठळक मुद्देउत्पन्न : विश्वास वाढविण्याचे एसटीचे प्रयत्न