त्र्यंबकेश्वर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ (मुले)मधील मुख्याध्यापक शोभा भिकू हुलमुखे (लोंढे) यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघटनेने ‘गुणवंत शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या हस्ते देण्यात आला. शोभा हुलमुखे (लोंढे) यांनी आपल्या कार्यकाळात शासनाचे विविध उपक्रम, संपूर्ण स्वच्छता अभियान, लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. ३२ वर्षांपासून त्या नाशिक-त्र्यंबक तालुक्याचे शैक्षणिक कार्य करीत आहेत. सध्या त्या त्र्यंबकेश्वर येथे मुख्याध्यापकपदावर कार्यरत असून, त्यांनी दुमजली शालेय इमारत बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना पीइजीइएल पुरस्कार मिळाला आहे. (वार्ताहर)
त्र्यंबकच्या शोभा हुलमुखे यांना पुरस्कार
By admin | Published: January 10, 2016 10:40 PM