पंचवटी : तपोवन केवडीबनातील श्री जलाराम सत्संग ट्रस्टच्या वतीने जलाराम बाप्पा यांची २१५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कृष्णधाम येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मालवीय चौक येथून जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.जयंती महोत्सवानिमित्ताने सकाळी मंगलआरती करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे यजमान करसनभाई ठक्कर यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी ११ वाजता थाळआरती तसेच महापूजा करण्यात आली.सायंकाळी ५ वाजता मालवीय चौकातील जलाराम मंदिर येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या चित्ररथात जलाराम बाप्पांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. सायंकाळी कृष्णधाम येथे रक्तदान तसेच संगीत संध्या हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष भाईलाल पूजारा, महेश शाह, विजयभाई सोमय्या, धनसुखभाई दावडा, नीलेश चंदे, जगदीश ठक्कर, नरेश दावडा, हसमुख शिंगाडा, संजय ठक्कर आदिंसह जलाराम सत्संग ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
जलाराम जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा
By admin | Published: October 30, 2014 11:43 PM