नाशिक : रविवार कारंजा येथील जैन स्थानकात डॉ. समकितमुनी म.सा., भवांतमुनी म.सा. व जयवंतमुनी म.सा. यांचा चतुर्मास मंगल सोहळा येत्या सोमवार (दि़ १५) पासून होणार असून यानिमित्त गुरुवार (दि़११) रोजी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत सजविलेल्या रथावर जैन गुरू विराजमान झाले होते. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी चतुर्मास सप्ताहात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. दि. १५ ते १७ दरम्यान ५०५ सामूहिक तप होणार होणार आहे़ तसेच या चतुर्मास सप्ताहामध्ये सव्वा लाख सामूहिक महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले़येत्या सोमवार (दि़ १५) पासून चतुर्मास प्रवचनास सुरुवात होणार आहे़ या सोहळ्यानंतर मोहनलाल लोढा यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी संगीता डुंगरवाल, सोहनलाल भंडारी, मंगलचंद साखला, सुभाष लोढा, पंकज श्यामसुका, पारसमल साखला, जयप्रकाश लुणावत, पंकज श्यामसुका, विजय कोठारी, सुभाष भंडारी, नंदलाल पारख, संगीता सुराणा, दिलीप कांकरिया, ज्ञानचंद कोठारी तसेच विविध राज्यांतून आलेले जैन समाजाचे पदाधिकारी व बांधव उपस्थित होते.जैन स्थानकात समितीचे सचिव सुभाष लोढा तसेच स्वागत समिती प्रमुख राजेंद्र डुंगरवाल यांनी सर्व पाहुणे व श्रावकांचे स्वागत केले.अध्यात्माची गोडीअध्यात्मासाठी धर्म व समाज या महत्त्वाच्या बाजू असून, त्यांची सांगड घालण्याचे काम या चतुर्मास सोहळ्यातून केले जाईल. यामध्ये चांगले विचार, शुद्ध आचार आत्मसात करता येतात. त्यामुळे भावी पिढीला अध्यात्माची गोडी लागणे महत्त्वाचे आहे, असे समकितमुनी म.सा. यावेळी म्हणाले़
चतुर्मास प्रवेशनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:17 AM
रविवार कारंजा येथील जैन स्थानकात डॉ. समकितमुनी म.सा., भवांतमुनी म.सा. व जयवंतमुनी म.सा. यांचा चतुर्मास मंगल सोहळा येत्या सोमवार (दि़ १५) पासून होणार असून यानिमित्त गुरुवार (दि़११) रोजी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.
ठळक मुद्देधार्मिक कार्यक्रम : मंगळवारपासून प्रवचन