नाशिक : जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वार बाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम सुरू असताना फॅब्रीकेशनचे काम करणाºया कर्मचाºयाला . सुदैवाने वीजतारांना रबर कोटींग असल्यामुळे जास्त प्रमाणात वीजेचा प्रवाह बसला नाही व तत्काळ तो पत्र्यावर फेकला गेला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, येथील नव्याने बांधकाम झालेल्या दुमजली घरावर नईम बशीर शेख (३०रा.कथडा) हा युवक फॅब्रीकेशन करत लोखंडी पत्रे बसवित होता. यावेळी त्याचा संपर्क अवघ्या एक फूटावर असलेल्या महावितरणच्या अतीउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी आला. यामुळे शेख यास वीजेचा शॉक लागून तो फेकला गेला. तत्काळ जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी हलविल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. चार दिवसांपुर्वीच शहरातील इंदिरानगर भागात विद्युत खांबावर दुरूस्ती करताना शॉक लागून महावितरणच्या तरुण कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना इंदिरानगर भागात घडली होती.
पत्रे बसविताना लागला तरुणाला वीजतारांचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:00 PM
जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वार बाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम सुरू असताना फॅब्रीकेशनचे काम करणाºया कर्मचाºयाला .
ठळक मुद्देनईम बशीर शेख (३०रा.कथडा) हा युवक फॅब्रीकेशन करत लोखंडी पत्रे बसवित होतालोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला वीजतारांना रबर कोटींग असल्यामुळे जास्त प्रमाणात वीजेचा प्रवाह बसला नाही अवघ्या एक फूटावर असलेल्या महावितरणच्या अतीउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी आला संपर्क