शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
2
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
3
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
4
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
5
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
6
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
7
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
8
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
9
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
10
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
11
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
12
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
13
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
14
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
15
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
16
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
17
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
18
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
19
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
20
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

धक्कादायक! बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकाऱ्याकडून साडेपाच कोटींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:31 IST

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास केला जात आहे.

नाशिक : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत तत्कालीन शाखाधिकारी संशयित आरोपी सुभाष विठ्ठल कौटे (४०, रा.संगमनेर) याने तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास केला जात आहे.

गंगापूररोडवरील थत्तेनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अॅग्री हायटेक शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी कौटे यांनी १० जानेवारी २०२३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत त्यांच्या पदाचा गैरवापर करत एकूण ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्याआधारे कर्ज मागणीची रक्कम कमी असताना ती जास्त असल्याचे दाखविले. तसेच कर्ज खाते नसतानासुद्धा कर्ज खाते असल्याचे भासवून त्या खात्यात कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम मंजूर करत तीन कर्जदारांच्या बचत खात्यात वर्ग करत एकूण सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा अपहार करत बँकेची व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

फिर्यादी शाखाधिकारी बी. बी. बेहरा यांनी जोखीम आधारित केलेल्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आला. यानंतर त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. बेहरा यांच्या फिर्यादीवरून कौटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे या करीत आहेत.

गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यतामुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जदाराला ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी व पडताळणी झाल्यावर संबंधितांचे कर्ज खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुरू करण्यात येते. या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने तीन वर्षांसाठी कर्जाची रक्कम जमा होत असते. ही रक्कम कर्जदारांच्या कर्ज खात्यात जमा करण्याऐवजी संशयित कौटे याने बचत खात्यात जमा केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का? तसेच फसवणुकीचा आकडादेखील यापेक्षा अधिक आहे का? याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. फसवणुकीची रक्कम वाढूदेखील शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :bankबँकCrime Newsगुन्हेगारीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रNashikनाशिक