नाशिक : आपल्या चुलत बहीणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने चार महिन्यांपुर्वी जवळ बोलावून घेत शरिराची वासना भागविणाऱ्या मामाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलीला कोरड्या उलट्या झाल्यानंतर तिला पालकांनी दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे निदान केले व सोनोग्राफी चाचणीअंती तिला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ गावाजवळ असलेल्या प्रभातनगर भागात एका सोसायटीत संशयित कुणाल जाधव (२१, रा.लोणघाट, जि.बुलढाणा) याने अल्पवयीन पिडित मुलीला स्वत:जवळ मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने ४ मार्च २०२० रोजी जवळ बोलावून घेत तीच्यासोबत अश्लील चाळे करत जीवे ठार मारण्याची धमकी देत शारिरिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या भीतीपोटी पिडित मुलीने तीच्या आईवडीलांना घडलेल्या घटनेपासून अद्याप काहीही सांगितले नाही; मात्र तिला त्रास होऊ लागल्याने या गंभीर गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत संशयित कुणालविरूध्द म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला उपनिरिक्षक जाधव या करीत अहेत.
धक्कादायक! चुलत मामाने बळजबरीने ठेवले अल्पवयीन भाचीसोबत शरीरसंबंध अन्....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 PM
मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने ४ मार्च २०२० रोजी जवळ बोलावून घेत तीच्यासोबत अश्लील चाळे करत जीवे ठार मारण्याची धमकी....
ठळक मुद्देतिला त्रास होऊ लागल्याने या गंभीर गुन्ह्याला वाचा फुटली.