दिंडोरी : तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील आशिष सुरेश चौधरी (३०) यांचा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक बळी गेला आहे. चौधरी यांच्या घराच्या पाठीमागे विद्युतवाहक खांब असून खांबाला ताण नसल्याने ट्रान्सफार्मरवरून येणाऱ्या तारा या चौधरी यांच्या शेतात लोंबकळत असल्याने शॉक लागून त्यांचा हकनाक बळी गेला आहे. विद्युतवाहक तारा गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतात लोंबकळत असल्याने चौधरी यांच्या वडिलांनी याबाबत महावितरणकडे तक्र ार करूनदेखील तारा न ओढल्याने मुलाचा बळी गेला, अशी संतप्त प्रतिक्रि या सुरेश चौधरी यांनी दिली. महावितरणाच्या कर्मचाºयांना वारंवार सांगूनही तारा न ओढल्याने आशिष चौधरी यांचा बळी गेला आहे. महावितरणला वारंवार ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे वेळोवेळी ठराव देऊनही महावितरणाकडून ग्रामसभेच्या ठरावालाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. गावातील विद्युतवाहक तारा या जीर्ण झाल्याने जोरात वारा आला तरी तारा तुटून खाली पडतात. आशिष एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या जाण्याने तळेगाव दिंडोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तळेगाव दिंडोरी येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:48 AM