शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

धक्कादायक : गोदावरीची उपनदी अरुणा महापालिकेच्या गावीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:19 PM

गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते.

ठळक मुद्देसिटी सर्व्हेच्या १९१७ सालच्या मुख्य डीएलआर नकाशात अरुणा नदीबॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर, १८८३च्या नकाशामध्ये अरुणा नदी

नाशिक : गोदावरीच्या रामकुंडात अरुणा नदीचा संगम असून या संगमाचे दाखले पुराणापासून बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझिटीयरमध्येही आढळतात; मात्र महापालिकेच्या गावी अरुणा नदी नसून एका माहिती अधिकाराच्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. गोदावरी-अरुणाच्या संगमावर रामकुंडात गोमुखातून हजारो भाविक पवित्र जल घेतात. महापालिकेने अरुणा नदीचे अस्तित्व नाकारणे ही गंभीर बाब असल्याचे गोदाप्रेमी सेवा संघटनेचे अध्यक्ष देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते. नंदिनी, अरुणा, वरुणा या गोदावरीच्या उपनद्या आहेत; मात्र महापालिकेच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी अरुणा नदीचा गोदावरी संवर्धन कक्षाच्या अभिलेखावर कुठलाही उल्लेख नसल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गोदावरी-अरुणा नदीच्या संदर्भात जानी यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात अर्जाद्वारे रामकुंडातील गौमुखातून पडणा-या प्रतिदिन पाण्याची मात्रा? रामकुंड ते अरुणा नदीच्या उगमस्थानापर्यंत नदीच्या मार्गावर करण्यात आलेल्या बांधकामाची सविस्तर माहिती? नाशिककरांना अरुणा नदी बघावयाची असल्यास कोठे व कोणत्या परिसरात जाऊन बघता येईल? असे प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांचे एकच सामुहिक उत्तर ‘अर्जाद्वारे विचारण्यात आलेली माहिती गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या अभिलेखावर आढळून येत नाही’ महापालिकेच्या जन माहिती अधिकाºयांकडून देण्यात आले. बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर, १८८३च्या नकाशामध्ये अरुणा नदी दाखविण्यात आली आहे. सिटी सर्व्हेच्या १९१७ सालच्या मुख्य डीएलआर नकाशात अरुणा नदी दाखविण्यात आली आहे. तसेच वर्षभरापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जानी यांनी महापालिका अधिकारी व आयुक्तांपुढे गोदावरी, उपनद्यांबाबत सादरीकरण केले होते.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका