नाशिक : लॅबोरेटरीच्या चूकीच्या निदानामुळे एखाद्या रूग्णाला किती भयानक उपचार आणि त्याची ‘किंमत’ मोजावी लागू शकते, याचा प्रत्यय आणून देणारी दुर्दैवी घटना शहरात उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्यामुळे लॅबोरेटरीमध्ये जाऊन डॉक्टरच्या सल्ल्याने निदान करून घेतले असता त्या महिलेचे चूकीचे निदान करत संबंधित लॅबोरेटीमधील ‘तज्ज्ञ’ मंडळीने कर्करोगाचा रिपोर्ट सोपविला. त्या रिपोर्टच्या अधारे महिलेवर एका रूग्णालयात दोनवेळा ‘केमो’थेरपीला सामोरे जावे लागले. त्यामुळे महिलेच्या पोटात वाढणारे दोन महिन्याचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित खासगी रेलीगर नावाच्या कंपनीला ग्राहकन्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावत दणका दिला.नाशिकरोडच्या रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या पोटात दुखू लागल्याने त्या निदानासाठी २००९ साली सप्टेंबर महिन्यात शहरातील एका रूग्णालयात तपासणीसाठी त्या गेल्या. त्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार महिलेने 'सुपर रेलिगर लॅबोरेटरिज'मध्ये बायस्पी चाचणी केली. लॅबने कर्करोगाचे निदान करत तसा तपासणी अहवाल महिलेला सोपविल्याने महिलेला धक्का बसला; मात्र मोठ्या धैर्याने त्यांनी उपचारासाठी तयारी दर्शवून उपचार सुरू केले. शंकेला वाव नको म्हणून त्या महिलेने पुन्हा मुंबईच्या एका नामांकित खासगी रूग्णालयात तपासणी करून घेतली. तेथील डॉक्टरांनीही त्यांना कुठल्याहीप्रकारचा कर्करोग नसल्याचे निदान केले. त्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीय प्रचंड गोंधळात सापडले. त्यानंतर या पिडित महिलेने थेट ग्राहकन्यायालयाचा दरवाजा ठोठावत संबंधित संबंधित लॅबोरेटरी चालविणाऱ्या अंधेरीच्या रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला. अॅड. सारिका शाह यांनी त्या महिलेची बाजू न्यायालयापुढे मांडली.
धक्कादायक : कर्करोगाचे चुकीचे निदान भोवले; महिलेच्या पोटातील बाळ ‘केमो’मुळे दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 7:41 PM
संबंधित खासगी रेलीगर नावाच्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावत दणका दिला.
ठळक मुद्देपोटात वाढणारे दोन महिन्याचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा