नाशिक : उन्हाळ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी सोसायटीच्या गच्चीवर जात असताना शेजारील व्यक्तीने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली. यावेळी विवाहितेचा पती तिला सोडविण्यासाठी धावला असता संशयित निलेश बाळासाहेब म्हस्के (रा.लोखंडेमळा) याने त्यास मारहाणदेखील केल्याची फिर्याद पिडितेने दिली आहे. पिडित महिला आपल्या कुटुंबियांसह दररोज घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी जाते. त्यांच्या शेजारी राहणारा निलेश म्हस्के हा मागील काही दिवसांपासून पिडितेला जीन्यामध्ये अडवून छेड काढत होता. मंगळवारी त्याने त्यांना जीन्यात अडवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अस कृत्य करत शिवीगाळ करून विनयभंग केला. यावेळी त्यांचे पती सोडवण्यासाठी आले असता म्हस्के याने त्यांना मारहाण केली. पिडीतेच्या तक्र ारीवरून म्हस्केवर विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा उपनगर पोलीसांनी दाखल केला आहे. पुढील तपास महिला उपनिरिक्षक तेली या करीत आहेत.दुस-या घटनेतसुध्दा अशाचप्रकारे शेजारी राहणा-या व्यक्तीकडूनच महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. किराकोळ कारणातून शेजाऱ्यांनी वाद उकरून काढत पिडित फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार अशोकामार्ग परिसात घडला. याप्रकरणी दिपक व्यंकटेश पाटील (५७) व स्वप्नील दिपक पाटील (३०,रा.अशोका मार्ग) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीता ही त्यांची शेजारी असून ते एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. पाटील कुटुंबियांनी अपार्टमेंटच्या कॉमन जागेत झाडाच्या कुंड्या ठेवल्या होत्या. झाडांना पाणी देताना कुंड्यांमधून पाणी पिडित महिलेच्या दारात येत असल्याने त्या शेजा-यांना याबाबत सांगण्यासाठी गेल्या असता संशयितांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरिक्षक अंकुश जाधव करत आहेत.
धक्कादायक : किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांकडूनच महिलांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 7:28 PM
पिडितेला जीन्यामध्ये अडवून छेड काढत होता. मंगळवारी त्याने त्यांना जीन्यात अडवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अस कृत्य करत शिवीगाळ करून विनयभंग केला.
ठळक मुद्देझाडांना पाणी देताना कुंड्यांमधून पाणी पिडित महिलेच्या दारात पिडितेला जीन्यामध्ये अडवून छेड