पाटोदा : येथील पाटोदा-लासलगाव रोडवरील कुणाल रेडिमेड या कापड दुकानात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून धाडसी चोरी केली. यात सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला .त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रामा निकम यांच्या कुणाल गारमेंट या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील शर्ट पॅन्ट साडी पातळ असा सुमारे १ लाख ३० हजार रु पये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्याची वायर तोडून तसेच हार्ड डिस्क व एल ई डी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. सदर हार्ड डिस्क एलईडी व कॅमेरे दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या नदीमध्ये आढळून आले. सकाळी दुकान उघडल्यानंतर सदर प्रकार लक्षात आल्यावर दुकान मालक निकम यांनी येवला पोलीस स्टेशनला माहिती दिली. तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, संजीवकुमार मोरे,संदीप सांगळे करीत आहे.
पाटोदा येथे दुकान फोडून धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:16 PM