नाशिक : ‘तुझे दुकान सुरू ठेवायचे असेल तर दहा हजारांचा हप्ता द्यावा लागेल’ तसेच ५० हजारांच्या खंडणीची मागणी करत दुकानमालकाला धमकावून लाथा-बुक्क्यांनी तिघा खंडणीखोर संशयितांनी मारहाण करत मोबाइल हिसकावून त्याच्याजवळील डेबिट कार्ड बळजबरीने ‘स्वॅप’ करत साडेपाच हजारांची रोकड लंपास केल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाइपलाइन रस्त्यावर फिर्यादी संजय सदा बिरारी (४५, रा. अशोकनगर) यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास संशयित अशोक शिवाजी चव्हाण (३४), भालचंद्र विठ्ठल देवरे (३३), अक्षय सैंदाने या तिघांनी येऊन बिरारी यांना मारहाण करत पाच हजाराची हप्त्याची रक्कम व ५० हजारांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिल्याने तिघांनी त्यांना बेदम माारहाण करण्यास सुरुवात केली. तिघांपैकी एकाने डेबिट कार्ड, मोबाइल हिसकावून घेत बळजबरीने एटीएम केंद्रातून साडेपाच हजारांची रोकड त्यांच्या खात्यातून काढून घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी चव्हाण व देवरे यास अटक केली असून, सैंदाने अद्याप फरार आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक बुराडे करीत आहेत.महात्मानगर रस्त्यावरून पारिजातनगरकडे अंतर्गत रस्त्याने जात असताना उद्यानाजवळ एका २३ वर्षीय युवतीच्या हातातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचा आयफोन मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हातोहात हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कीर्ती भाऊसाहेब सोनवणे (२३, रा. अदिती सोसा., पारिजातनगर) आठवडाभरापूर्वी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी येत असताना दोघा दुचाकीस्वारांनी तिच्या हातातून आयफोन हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून राहत्या घराच्या वाहनतळातून महेंद्र बबनराव देशमुख (३८, शिवम पार्क, कलानगर) यांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच ४१ पी ३१३५) चोरट्यांनी लंपास केली. सुमारे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास पळविल्याने संताप व्यक्त होत आहे.मोटारी फोडून कारटेप लंपासमहात्मानगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी कारटेप लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.कॉलेजरोड, महात्मानगर, पारिजातनगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी संगीता अनिल गायकवाड यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.३) चोरट्यांनी दोन्ही मोटारींना लक्ष्य केले. एमएच१५, ईपी ७४३८ व एमएच १५, ईपी ३००८ यातील एका कारमधील दहा हजार रु पयांचा कारटेप व दुसºया कारमधील महत्त्वाची क ागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आयशरच्या धडकेत महिला ठारभरधाव आयशर टेम्पो चालकाने रस्त्याकडे दुर्लक्ष करीत एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९जून रोजी अशोकनगर परिसरातून रात्री नऊच्या सुमारास दिनेश सुधाकर महाजन (४०) हे त्यांच्या पत्नी मनीषा दिनेश महाजन (३२) दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अज्ञात आयशर टेम्पोचालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने मनीषा रस्त्यावर कोसळल्या. धडक दिल्याचे लक्षात आले असता टेम्पोचालकाने वाहन न थांबविता घटनास्थळावरून पुढे नेले. यावेळी रस्त्यावर पडलेल्या मनीषा यांच्या पायावरून वाहन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिनेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आयशर टेम्पो चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मैत्रिणीसोबत चॅटिंगची कुरापत काढून मारहाण मैत्रिणीसोबत चॅटिंग केल्याप्रकरणी कुरापत काढून तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सोमराजन वासू (५६, रा. वडाळागाव) यांनी संशयित सलमान सय्यद, राजू अली सय्यद आणि शाहरु ख शेख व त्यांचा एका साथीदाराविरुद्ध (तिघे रा. वडाळागाव) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. या मारहाणीत सोमराजन यांचा मुलगा सुप्रीम याच्या कानास गंभीर दुखापत झाली आहे. २१ जूनला सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला होता. सुप्रीम त्याच्या मैत्रिणीसोबत चॅटिंग करीत असल्याची माहिती संशयिताना मिळाल्याने त्यांनी कुरापत काढून सुप्रीमसह त्याचा मित्र श्याम वानखेडे, धर्मराज महाजन आणि राज जोशी यांना बेदम मारहाण केली.
हप्त्यासह खंडणीवसुलीसाठी दुकानदाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:36 AM
नाशिक : ‘तुझे दुकान सुरू ठेवायचे असेल तर दहा हजारांचा हप्ता द्यावा लागेल’ तसेच ५० हजारांच्या खंडणीची मागणी करत दुकानमालकाला धमकावून लाथा-बुक्क्यांनी तिघा खंडणीखोर संशयितांनी मारहाण करत मोबाइल हिसकावून त्याच्याजवळील डेबिट कार्ड बळजबरीने ‘स्वॅप’ करत साडेपाच हजारांची रोकड लंपास केल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
ठळक मुद्देवाढती गुन्हेगारी : ९० हजारांच्या आयफोनसह दुचाकी लांबविली सातपूरला आयशरच्या धडकेत महिला ठार