नाशिक : येथील सिडको परिसरातील कामटवाडे शिवारातील एका भंगारमालाच्या टपरीवजा दुकानाला सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर अग्निशामक उपकेंद्राचे बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पेटलेले दुकान पाण्याचा मारा करुन विझविले. अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविणे जवानांना शक्य झाले. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे सकाळच्या सुमारास भर वर्दळीच्या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आली. यामुळे या दुकानाला लागून असलेल्या अन्य दुकानांना आगीची झळ बसण्याचा धोका टळला. दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना अग्निशामक दलाला मिळताच सिडको केंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान, आग लवकर आटोक्यात यावी, यासाठी या बंबाच्या मदतीला सातपूर केंद्राचाही बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला होता. या आगीच्या घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सिडको येथे भंगारमालाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:34 PM
नाशिक : येथील सिडको परिसरातील कामटवाडे शिवारातील एका भंगारमालाच्या टपरीवजा दुकानाला सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर अग्निशामक उपकेंद्राचे बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पेटलेले दुकान पाण्याचा मारा करुन विझविले. अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविणे जवानांना शक्य झाले. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे सकाळच्या ...
ठळक मुद्दे सातपूर अग्निशामक उपकेंद्राचे बंब घटनास्थळी अन्य दुकानांना आगीची झळ बसण्याचा धोका टळलाआगीचे निश्चित कारण समजू शकले नाही