जायखेडा : ताहाराबाद येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर जायखेडा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरातील अनेक गावात मंगळवारी दुसºया दिवशीही लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अत्यावश्यक सेवावगळता ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने मंगळवारीही सर्वत्र शुकशुकाट होता.जमावबंदी असतानाही काही ठिकाणी तरु णांसह ज्येष्ठ नागरिक बेफिकीरपणे घोळक्यात जमा होऊन गप्पांच्या मैफली रंगविताना दिसून आले. याबाबत जाणकारांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. पोलीस प्रशासनाला अनावश्यक गर्दी दूर करण्यासाठी व जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी समज देण्याबरोबरच बळाचा वापर करावा लागला. प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे यांनी केले. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य ओळखून सर्वांनी नियमांचे पालन करावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी केले आहे.
दुकानदारांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:09 PM