नाशिक : कोरोनाचा देशभर कहर सुरू असतानाच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अनलॉकची प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून, अनलॉक-३नुसार व ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू झाले आहेत. मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना सॅनिटायझर, मास्क यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी खबरदारी घेत, तसेच थर्मल स्कॅनिंग करून मॉल व्यस्थापनाकडून ग्राहक ांचे स्वागत केले जात आहे.कोरोना संकटामध्ये बंद केलेले मॉल्स काही नियम-अटींसह सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानुसार शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू झाले. साडेतीन महिन्यांनंतर मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहक आनंदित झाले असून, मॉल्समधील कर्मचारी, विविध शॉप्सचे मालक, सेल्समनही ग्राहकांचे उत्साहाने स्वागत करताना दिसून येत आहेत. ग्राहक सेवा केंद्रापासून ते विक्रीच्या काउंटरपर्यंत ग्राहकांना उत्तम सेवा दिली जात असून, ग्राहकही खरेदी करताना आपल्या सुरक्षेची काळजी घेताना दिसून आले. असे असले मॉल व्यवस्थापनाकडून प्रतिबंधात्मक खबरदारीविषयी नियमित सूचनाही दिल्या जात आहेत.अनलॉकच्या नियमानुसार मॉल्स सुरू करण्यात आल्यानंतर मॉल्स संचालकांकडून सुरक्षिततेचे व्यापक नियोजन केले जात आहे. तसेच ग्राहकांना उद्घोषणेवरून सुरक्षिततेचा संदेश देखील दिला जात आहे. ज्या काउंटरवर गर्दी झाली असेल किंवा डिस्टन्स नियमाचा भंग होत असेल अशा ठिकाणी उद्घोषणेवरून तत्काळ सृचना केल्या जात असल्याने सुरक्षा रक्षक ही गर्दीवरील नियंत्रणासाठी तत्पर होत आहे.ग्राहकांची काळजी : गर्दीवर नियंत्रणाचे नियोजनशासनाच्या निर्देशांनुसार, मॉल्समधील ग्राहकांची संख्याही निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची खबरदारीही घेतली जात आहे. त्यासाठी खास कॅमेरे बसविण्यात आले आहे. येणाºया प्रत्येक व्यक्तींवर लक्ष ठेवले जात असल्याने आत येणारे आणि बाहेर जाणाऱ्यांचे योग्य प्रमाण राखले जात आहे.पार्किंगमध्येही गर्दी होऊ नये यासाठीचे देखील नियोजन करण्यात आलेआहे. दोन वाहनांमध्ये अंतर ठेवण्याची काळजी घेण्यात आली आहे.
शहरात शॉपिंग मॉल्स सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 1:09 AM
कोरोनाचा देशभर कहर सुरू असतानाच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अनलॉकची प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून, अनलॉक-३नुसार व ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू झाले आहेत.
ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सचे पालन : प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ग्राहकांचे स्वागत