शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

मफलरसह मखमली स्टॉल्स खरेदीचा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:01 AM

दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून, अनेक नवनवीन डिझाइनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे.

नाशिक : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून, अनेक नवनवीन डिझाइनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातूनही ग्राहक येत असल्याने शालिमार, मेनरोड, कॉलेजरोड, तिबेटियन मार्के टसह शहरातील विविध भागांत तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेल्या दुकानांमध्येही गर्दी दिसून येत आहे.  हिवाळा येताच उबदार कपड्यांचा बाजारही गरम होणे सुरू होतो. बाजारात सुंदर-सुंदर स्वेटर व जॅकेटची बहार असते, तसेच सिल्कचे स्टॉल मुलींचे केंद्रबिंदू आहे. हे स्टॉल्स निरनिराळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतात. दुचाकी चालवताना किंवा थंडीत चेहºयाला कोरडी आणि निस्तेज होण्यापासून बचावासाठी मुली या स्टॉल्सचा प्रयोग करतात. सिल्क स्टॉल सूट सलवार, जीन्स व केप्री सर्व वेशभूषेत तरुणींना वेगळाच लूक देतो. बाजारात हे स्टॉल १०० रु पयांपासून पाचशे ते हजार रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत.  ड्रेसशी मॅचिंग किंवा आपल्या आवडत्या रंगाच्या स्टॉलचा वापर करून आपल्या ड्रेसची शोभा वाढविण्यासाठी मुलींकडून नवनवीन स्टॉल्सच्या खरेदीला पसंती मिळत आहे. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे. आपल्या ड्रेसप्रमाणे आपला थंडीचा पेहराव असावा असे महिलांना वाटते, तर पुरुषांनाही इतरांपासून आपला लूक वेगळा दिसावा यासाठी ट्रेण्डी जॅकेट व मफलर यांसारख्या उबदार कपड्यांची खरेदी करण्याची इच्छा असल्याने आपल्याला हवे तसे आणि व्यक्तिमत्त्वात भर घालणाºया उबदार कपड्यांना तरुणांची पसंती मिळत आहे.विविध दरातील वस्तू उपलब्ध विविध प्रकारचे उबदार कपडे तसेच बालकांसाठी खास गरम कपडे बाजारात गर्दी करून आहेत. ५० रुपयांपासून जवळपास पाच हजार रुपयांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांच्या माफक दरातही योग्य वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळ्याचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत.स्वेटर्सनी सजली दुकाने दिवाळीनंतर आता थंडीचा जोर वाढत चालला आहे. थंडीपासून संरक्षण म्हणून उबदार कपड्यांना मोठी मागणी असते. हिवाळ्यातील उबदार कपडे आणि विविध प्रकारच्या आधुनिक स्वेटरच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक सरसावल्याचे दिसून येते. स्थानिक शहरात अनेक ठिकाणी आणि खास करून तिबेटियन मार्केट परिसरात विविध प्रकारच्या स्वेटरची दुकाने सजली आहेत.तरु णाई महाग व फॅशनेबल कपड्यांना पसंती देताना दिसत आहे. तरु णाई एकत्रितपणे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानेही गर्दीने फुललेली दिसतात. शहरातील थंडीत वाढ झाल्यामुळे बाजारात लोकरीच्या उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. लहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाइनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. जेन्ट्स, लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, लेस्कोटी, स्वेटकोटी, कुर्तापॅटर्न, सलवार सूट, जॅकेट, टी-शर्ट, जेण्ट्स मास्क फॅन्सी स्वेटर, हॅण्ड ग्लोव्हज, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, टोपी, कॅप्स अशा वस्तूंना मागणी आहे.  - आशिष कोटवाला ,संचालक, मयूर कलेक्शन