शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सिन्नरला जीवनावश्यक सेवा वगळता दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 11:58 PM

सिन्नर : शहर व तालुक्यात ह्यब्रेक द चेनह्णचे निर्बंध लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सिन्नर शहर व तालुक्यात शुकशुकाट सुरू होता. दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने, पिठाच्या गिरण्या, फळविक्रेते यांची दुकाने सुरू होती. तर हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा पुरविण्यात येत होती.

ठळक मुद्देसिन्नर: दातली येथे विवाहसोहळ्यात नियमांचा भंग करणाऱ्यांना दंड

सिन्नर : शहर व तालुक्यात ह्यब्रेक द चेनह्णचे निर्बंध लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सिन्नर शहर व तालुक्यात शुकशुकाट सुरू होता. दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने, पिठाच्या गिरण्या, फळविक्रेते यांची दुकाने सुरू होती. तर हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा पुरविण्यात येत होती.ह्यब्रेक द चेनह्णच्या नावाखाली शासनाने एकप्रकारे लॉकडाऊन लावल्याची संतप्त प्रतिक्रिया इतर व्यावसायिकांनी दिली. कापड विक्रेते, शिवणकाम करणारे, कटलरी दुकाने यांच्यासह जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. बॅँका व इतर आर्थिक व्यवहारासाठी नागरिक आल्याचे दिसून येत होते. शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याने बसची गर्दी कमी झाली होती. बसला प्रवासी कमी मिळाल्याने बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याची माहिती सिन्नर आगारातून देण्यात आली. प्रवाशांची संख्या अशाच पद्धतीने घटल्यास येत्या दोन-तीन दिवसात बसफेऱ्या निम्म्यावर येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.लॉकडाऊन होण्याची धास्ती अनेक व्यावसायिकांनी घेतली होती. मात्रए शासनाने ह्यब्रेक द चेनह्ण नावाने नवीन मिशन हाती घेतले असले तरी याबाबत व्यावसायिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. तर काहींकडून या ब्रेक द चेनचे समर्थन केले जात होते. नवीन नियमावलीबाबत अनेक व्यावसायिक व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नवीन नियम नेमके काय असणार याबाबत अनेकांकडून एकमेकांकडे विचारणा केली जात होती. मंगळवारी सकाळी अनेकांनी दुकाने उघडली. नंतर पुन्हा बंद केली. मात्रए दुपारनंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाल्याचेही दिसून आले.दातली येथे तीन विवाह सोहळ्यांवर धाड; २५ हजारांचा दंड वसूलसिन्नर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असताना विवाह सोहळ्यांना ५० पेक्षा जास्त लोक येत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात प्राप्त होत होत्या. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. नायब तहसीलदार नितीन गर्जे, दत्ता सोनवणे, विशाल धुमाळ, राजेंद्र खडसाळे, मुरलीधर चौरे, रवींद्र लोखंडे यांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सुटीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहे. दातली येथे साखरपुड्यासह विवाह सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या विवाह सोहळ्यासाठी परवानगी काढण्यात आली नव्हती. ५० पेक्षा जास्त व्यक्ती या विवाह सोहळ्यात असल्याचे समजल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे पथक दातली येथे पोहोचले. तीन विवाह सोहळ्यात नियमापेक्षा जास्त गर्दी असल्याने या दोन विवाह सोहळ्यांच्या आयोजकांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड करण्यात आला. तर तिसऱ्या विवाह सोहळयात ७० ते ८० व्यक्ती असल्याने त्यांना ५ हजारांचा दंड करण्यात आला. तीन विवाह सोहळ्यांच्या आयोजकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती विवाह सोहळ्यात आढळून आल्यास या पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.५ पथके व १५ नोडल अधिकारीसिन्नर शहर व तालुक्यात जीवनावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, सिन्नर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे व वावी पोलीस ठाणे यांचे प्रत्येकी एक पथक अशी पाच पथके ब्रेक द चेन यात काम करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. याशिवाय १५ नोडल अधिकारी गावोगावी बारीक लक्ष ठेवून असणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यात मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.वावी येथे २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूलब्रेक द चेन यात आठवडे बाजार बंद असणार आहे. तथापि, वावी येथे काही भाजीपाला विक्रेत्यांकडून नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्यासह महसूल व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक बाजारतळावर गेले. विनामास्क व आठवडे बाजारत दुकान लावल्यामुळे व्यावसायिकांकडून २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी दिली.संस्थात्मक विलगीकरणावर भर देणारसिन्नर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावोगावी कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली. गावोगावी जिल्हा परिषद शाळेत हे विलगीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी केले आहे. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या