नाशिक - गेल्या अडीच महिन्यांपासून लॉक डाऊनमुळे बंद असलेल्या शहरातीलबाजारपेठा शनिवार (दि.६) पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने समआणि विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यात आरोग्यसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मात्र तत्काळ कारवाई करूनती बंद करण्यात येतील अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदिली.कोरोना प्रतिबंधक उपाययोजनचा भाग म्हणून गेल्या २४ मार्च पासून लॉक डाऊनसुरू असून शहरातील बहुतांशी दुकाने बंद आहेत.आता शासनाने मिशन बिगॅनअगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व कामकाज सुरळीत करण्याचे आदेश दिलेअसून त्याअंतर्गत शहरातील बाजारपेठा शनिवारपासून (दि.६) खुल्या होणारआहेत. यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) महापालिका मुख्यालयात व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणिसर्व प्रकारच्या सूचना केल्या.शहरातील सर्व बाजारपेठा आणि दुकाने शहर वाहतूक पोलीस शाखेच्याअधिसूचनेनुसार सम आणि विषम तारखांना खुली राहतील. म्हणजेच रस्त्याच्यापॅसेज किंवा लेन लगतची दुकाने २, ४, ६, ८,१० अशा तारखंना खुली होतील तरत्यांच्या समोरील बाजुची दूकाने ३,५,७,९ अशा तारखांना खुली राहतील. सर्वदुकाने सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत.कोरोना सर्सग टाळण्यासाठी शसनाच्या आरोग्य विषयक नियमांचे पालन करणेदुकानदारांना आवश्यक आहे. त्यानुसार मास्क, हँडग्लोजचा वापर अनिवार्यराहील. तसेच दुकाने वेळावेळी निर्जंतुक करावी लागतील. दुकानातील ट्रायलरूमचा वापर करता येणार नाही तसेच एक्सेंज आणि रिटर्न पॉलीसला परवानगीअसणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यानंतर देखील दुकानात फिजीकलडिस्टन्सिंग साठी फुट मार्क, टोकन सिस्टीम, होम डिलेव्हरी याबाबतनागरीकांना प्रोत्साहीत करावे लागणार आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघनकेल्यास बाजार किंवा दुकाने त्वरीत बंद करण्यात येणार आहे.या बैठकीस मनपाचे कर उपआयुक्त प्रदीप चौधरी, महाराष्टÑ चेंबर आॅफकॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सचिव चंद्रकांत दीक्षीत, धान्य व्यापारीसंघटनेचे प्रफुल्ल संचेती, , रेडीमेड कापड संघटनेचे नरेश पारख, सराफअसोसिएशनचे चेतन राजापूरकर, स्टेशनरी असोसिएशनचे अतुल पवार, दिपककुंभकर्ण, चप्पल शुज व्यापारी संघटनेचे संदीप आहेर, पीठ- गिरणी संघटनेचेबाळासाहेब मते, दुध मिठाई नमकीन संघटनेचे अध्यक्ष मनोज कोटकर यांच्यासहअन्य विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.इन्फो..ही दुकाने राहणार बंदेशहरातील मॉल, व्यापारी संकु ले तसेच शासनाने प्रतिबंधीत ठेवलेली केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर, शॉपींग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणिपर्यंटनासंदर्भातील सेवा मात्र बंद ठेवण्यात येणार आहे.इन्फो...यांना नियमावलीतून सूटशहरातील सम- विषम तारखांचा नियम मात्र भाजीपाला, फळे विक्री करणारे,किराणा, औषध दुकाने, बी- बियाणे विक्रीच्या दुकानांबरोबरच अन्यजीवनावश्यक वस्तु विक्रीच्या दुकानांना लागु राहणार नाहीत. ज्याबाजारपेठा आणि बाजारपेठ परीसराचा वाहतूक शाखेच्या अधिसूचनेत समावेश नसेल,अशा ठिकाणी दुकाने उघडी ठेवण्याबाबत विभागीय अधिकारी स्थानिकपरिस्थतीतीचा विचार करून सम- विषम याच धर्तीवर निर्णय घेतील.इन्फो..ग्राहकांना आवाहनग्राहकांनी खरेदीसाठी बाहेर जाताना शक्यतो पायी जावे किंवा सायकलचा वापरकरावा, शक्यतो आपल्या घराजवळील बाजारपेठेतच जावे, अन्यावश्यक वस्तुंसाठीलांब पल्याच्या प्रवासांना परवानी दिली जाणार नाही. खरेदीसाठी मोठ्यामोटारी सारख्या वाहनांचा वापर करण्यास मनाई असेल.