लोहोणेर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने लोहोणेर गावातील सर्व व्यवहार रविवार (दि.२३) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू करण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे.
कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लोहोणेर गावातील व्यापारी वर्ग व गावातील सर्व नागरिकांनी सलग दोन महिने जनता कर्फ्यू पाळला व प्रशासनाला सहकार्य केले. करोना काळात नाशिक जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले तेव्हा सुद्धा लोहोणेर गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
गावातील दुकानदारांना सर्वच गोष्टीचे नियम व आरोग्याची काळजी घेत, शासनाने दिलेले आदेश व नियमानुसार सकाळी ७ ते ११ अशा कालावधीमध्ये दुकान चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येक दुकानदाराला कोरोना टेस्ट तपासणी बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले.