शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

राज्यात आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 9:06 PM

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचे अद्याप ३० टक्के प्रवेशही निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे आॅगस्टअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया कशी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे३१ आॅगस्टपर्यंत मुदत : केवळ २८ हजार प्रवेश निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचे अद्याप ३० टक्के प्रवेशही निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे आॅगस्टअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया कशी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आरटीईअंतर्गत नाशिक जिल्'ात रविवारी (दि.९) सायंकाळपर्यंत सुमारे २४४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ६८१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे, तर राज्यभरात आतापर्यंत केवळ २८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ४७ हजार २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. आता लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परंतु, इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन या संघटनेने गेल्या पंधरवड्यापासून आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रतिकूल भूमिका घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. अशा विद्यार्थ्यांना लॉटरीत निवड होऊन प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटईटी प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

प्रवेशांची स्थिती नाशिक राज्य शाळा - ४४७ ९,३३१ राखीव जागा- ५,५५७ १,१५,४४९ आॅनलाइन अर्ज- १७,६३० २,९१,३६३ लॉटरीत निवड- ५,३०७ १,००,९२६ प्राथमिक प्रवेश- २,६८१ ४७,०२० प्रवेश निश्चित- २,४४६ २८,००५

इंग्रजी शाळांना आरटीईचा टक्का वाढण्याची भितीकोरोनामुळे सर्वसाधारण गटातील मुलांचे प्रवेश होऊ शकलेले नसताना आटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवेशांच्या तुलनेत शिक्षण हक्क कायद्यांतगत दिले जाणारे प्रवेश २५ टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची भीती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून प्रवेशप्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेश संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली असली तरी कागदपत्रांची पडताळणी होऊ न शकल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश निश्चित होऊ शकलेली नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा