पंचवटी : गंगाघाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालयासमोर असलेल्या पालिकेच्या भूखंडावर भाजीमंडई इमारत उभारली आहे. सदर इमारतीत भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा विक्र ेत्यांसाठी ४६८ ओटे बांधले असून, ओट्यांचा लिलाव करण्यात आला. लिलाव प्रक्रियेत बोटावर मोजण्या इतक्या व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला होता त्यामुळे केवळ २१ ओट्यांचा लिलाव झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.महापालिका प्रशासनाने सदर भाजीमंडईत व्यवसायासाठी जवळपास ४६८ ओटे तयार केले आहेत. मंगळवारच्या दिवशी महापालिकेने लिलाव प्रक्रि या राबविली असली तरी प्रत्यक्षात व्यावसायिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने अजूनही जवळपास ४४८ ओट्यांचा लिलाव होणे बाकी आहे त्यामुळे आता सदर ओट्यांची लिलावप्रक्रि या नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. मनपाने तयार केलेल्या ओट्यांपैकी १९ दिव्यांगांसाठी तर १९ ओटे अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्तांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित ४३० ओटे विना आरक्षित सर्वसाधारण गटासाठी आहेत.काल झालेल्या लिलाव प्रक्रि येत २१ ओट्यांचा लिलाव झाला त्यात सर्वसाधारण १२, दिव्यांग ३ तसेच ६ अनुसूचित जाती जमातीच्या गटाला देण्यात आले. महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी भाजीमंडई उभारली खरी, मात्र भाजीविक्रेते त्या ठिकाणी येण्यास तयार नसल्याने सध्या इमारत धूळखात पडून आहे. प्रशासनाने यापूर्वी ओट्यांची लिलाव प्रक्रि या राबविली होती मात्र व्यावसायिकांकडून कोणताही विशेष असा प्रतिसाद मिळालेला नव्हता त्यामुळे प्रशासनावर वारंवार फेरलिलाव काढण्याची नामुष्की ओढावली जात आहे.
भाजीमंडईतील गाळे लिलावाला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:27 AM