लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, ही इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. शासनाने सवलतीच्या दरात म्हणजेच बाराशे रुपयात ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार काही मेडिकल दुकानांमध्ये ती उपलब्ध झाली आहेत. परंतु, रुग्णसंख्या बघता ती पुरेशी नाहीत. त्यामुळे मेडिकल दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आज आम्ही स्वतः ह्या परिस्थितीतून गेलो आहे. मी स्वतः मृत्यूच्या दारातून परत आलो आहे. ही वेळ शहरातील अन्य नागरिकांवर येऊ नये, असे मत देवा पाटील यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन शहरात उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती निखिल पवार यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांवर जेथे उपचार सुरू आहेत, त्या-त्या दवाखान्यात रेमडेसिवीर इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच शहरात मुबलक प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
---------------------------
सवलतीच्या दराव द्यावे
ज्या-ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण दाखल आहेत तेथेच सवलतीच्या दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी फिरावे लागणार नाही. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांनाही विविध ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी फिरल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----------
मालेगावी तहसीलदारांना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, देवा पाटील आदींनी निवेदन दिले. (१० मालेगाव १)
===Photopath===
100421\10nsk_7_10042021_13.jpg
===Caption===
१० मालेगाव १