येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शासकीय कामकाज असो व आप्तस्वकीयांना संदेश पाठविण्यासाठी पूर्वी पोस्ट कार्डाचा वापर सर्वत्र केला जात होता. ५० पैश्याच्या पोस्ट कार्डद्वारे देशाच्या कोणत्याही कोपर्यात संदेश पाठवले जात असल्याने त्यास पसंती देखील मिळत होती. मात्र आता सोशल मिडीयाच्या जमान्यात व्हाटस अप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या अॅपमुळे आप्तस्वकीय जणू काही एकमेकांच्या जवळच आले आहे.त्यामुळे पोस्ट कार्डच्या वापरावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. विविध शासकीय कार्यालये, बँकिंग कार्यालये तसे काही ग्रुप संदेश पाठविण्यासाठी आजही पोस्ट कार्डचा वापर आजही केलाजातो.मात्र निवडणुकीच्या काळात वापर वाढल्याने गेल्या एकदोन मिहन्यापासून पोस्टकार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येवल्यातील टपाल कार्यालयात पोस्ट कार्ड उपलब्ध नसल्याची माहिती समोर आलीआहे.सोशल मिडीयाच्या जमान्यात पोस्ट कार्डची जेमतेम विक्र ी होत असते. यात बहुतांशी जाहिरात एजन्सी, बँकिंग क्षेत्र, शासकीय कार्यालयाकडून मागणी केली जाते. मात्र काही महिन्यापासून पोस्ट कार्ड उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील 6 मिहन्यापासून दोन्ही ठिकाणी पोस्ट कार्डचा साठा शिल्लक नसल्याने पोस्ट आॅफिस ग्राहकांना कार्ड पुरवू शकले नाही. तरी आपण यावर एक उपाय करू शकता, जर आपण पोस्ट कार्ड साईझचे कार्ड पेपर कापूण त्यावर पोस्ट कार्ड प्रमाणे मजकूर लिहल्यास व त्यास ५० पैशाचे तिकीट लावल्यास आपणास ते ५० पैशात पाठवता येईल. - संदीप देसले, पोस्टमास्तर, येवला
टपाल कार्यालयात पोस्टकार्डचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 10:53 PM
येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देयेवला : मामाचे पत्र हरवले म्हणण्याची आली वेळ