शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

युरिया खतांचा तुटवडा, पिकांवर अळींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:15 AM

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे ...

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या युरिया खताबाबत ही बाब उपस्थित होते. वितरकांनाच मागणीप्रमाणे खत उपलब्ध होत नसल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. यातूनच तक्रारींचा पाढा वाचला जातो अन् विक्रेते आणि त्या पाठोपाठ कृषी विभागही राजकीय पक्ष संघटनाकडून लक्ष्य होतो.

सध्या खरीप हंगाम सुरू असून, या हंगामातही तालुक्यातील युरिया खताबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, प्रहार संघटनेने केलेले अर्धनग्न ठिय्या आंदोलनाने प्रश्‍न राज्यभर पोहोचला आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने येवल्यात थोड जरी खुट्ट झाले की त्याची चर्चा रंगते. आंदोलनाने यंत्रणा सक्रिय झाली आणि युरिया उपलब्धतेबाबत खुद्द पालकमंत्री आणि कृषी विभागाकडून प्रयत्न केले गेले. यातून तालुक्यात अनेक वितरकांकडे खत उपलब्ध असल्याचेही दिसून आले. काही भागातील वितरकांनी तर मागणी नसल्याचेही सांगितले.

तालुक्यातील पाऊसमानातील बदलाने पीक पद्धतीतही बदल होत चालले आहेत. सर्वत्र सारखा पाऊस होत नसल्याने ज्या भागात पाऊस होतो त्या भागात पीक पेरण्या होतात, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या जातात. यात दुबार पेरणीचेही संकट येते. कालमानात होणाऱ्या बदलाने बाजारातील खत, औषध आणि बियाणे बाजारातील मागणीवरही बदल दिसून येतो.

यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या; परंतु वाढत्या तापमानाने बहुतांश बियाणे उगवले नाही. त्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर मृगाचा पाऊस उशिरा सुरू झाला. काही भागात पाऊस गायब, तर काही भागात समाधानकारक पाऊस नसल्याने यावर्षी काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. यातून सोयाबीन उगवले नाही तर मका वा इतर पिके शेतकऱ्यांनी घेतले. दरवर्षी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभाग नियोजन करीत असते, परंतु बदलत्या पाऊस पद्धतीने त्यांचेही नियोजन कोलमडत असल्याचे दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून मक्यावर लष्करी अळी, सोयाबीनवर उंटअळींचे आक्रमण होत आहे. यावर्षीही या पिकांवर या अळींचे आक्रमण झाले आहे, तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत टोमॅटो, भेंडी, वांगे, पालक, आदी भाजीपाला पिके घेणे पसंत केले आहे. या भाजीपाला पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

इन्फो

७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

येवला तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, आदी पिकांची पेरणी होते. यंदा पाऊस तीन टप्प्यांत झाल्याने पेरण्याही तीन टप्प्यात झाल्या आहेत. ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, ६ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ३२१ हेक्टर क्षेत्रावर तूर, १२४ हेक्टर क्षेत्रावर उडीद, तर १६ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य असे एकूण ७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

सध्या पीक परिस्थिती चांगली असून, शेतीची आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. जूनअखेर २ हजार ६५० मेट्रिक टन, तर जुलै महिन्यात १ हजार ९८० मेट्रिक टन असा एकूण ४ हजार ६३० मेट्रिक टन इतका युरिया खत तालुक्यात टप्प्याटप्प्याने पुरवठा झाला आहे. सध्या तालुक्यात २६२ मेट्रिक टन खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे, तर खरीप हंगामासाठी ६ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६९३९.६८ लाख पीक कर्ज वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.