खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी दिवळीच्या सुरु वातीला थंडीची चाहूल लागते. मात्र यंदा दिवाळीपुर्वी तीन दिवस पाऊस झाला होता. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरु झाली होती. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कारण काल सायंकाळी पाच वाजेनंतर खेडलेझुंगे, सारोळेथडी, रु ई, कोळगांव, धारणगांव विर व खडक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोºयावर आलेल्या द्राक्षबागा आणि डाळिंब बागांना फटका बसून परिसरातील द्राक्षबाग व डाळींब बागांचे मोठे नुकसान होण्याची चिन्ह निर्माण दिसुन येत आहे. कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे. परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने फुलोºयातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. ज्या डाळींब बागांना फळफुल लागलेले आहे ते गळुन पडणार आहे. अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे तर काही भागात या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने नुकसानीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. परिसरात नुकसानीची शासन स्तरावरु न पाहाणी करु न मदत जाहीर करण्यात यावी असे शेतकरी वर्गाकडुन मागणी होत आहे.
अवकाळीचा रब्बी हंगामाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 2:22 PM