नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला. युतीसाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केल्याच्या विषयावरून उलटसुलट दावे सुरू असून, त्याबाबत बोलताना महाजन यांनी दूरध्वनी केला किंवा नाही केला अशाप्रकारच्या अनेक अफवा निवडणुकीच्या काळात पसरत असतात. त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. परंतु काही घडलेच तर ते प्रवक्ते त्वरित सांगतील, तूर्तास युतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाने लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मात्र जे भाजपाकडे लोकसभा मतदार संघ आहेत त्याविषयीच आढावा घेण्यात आल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. स्वामीनाथन आयोग असो किंवा अन्य विषय असो, त्यांच्या अनेक मागण्या कार्यवाहीत आहेत. लोकआयुक्त नेमण्याच्या दिल्लीतील कामकाज अंतिम टप्प्यात आहे. निवड समितीचा प्रश्नदेखील सोडविण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्तीचा विषय बाकी असला तरी पंधरा दिवसांत हेही काम पूर्ण होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे यासंदर्भातील पत्र घेऊन हजारे यांची पुन्हा भेट घेऊ, असेही महाजन म्हणाले. हजारे यांच्या आणि त्यांच्या टीमच्या संपर्कात आपण आहोत आणि चर्चाही करीत आहोत. हजारे यांच्या वयाला आणि तब्येतीला आंदोलन मानवणारे नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.
युतीचा निर्णय सेनेने लवकर घ्यावा : महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:41 AM
नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला.