नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर ढोल वाजवून पुण्यतिथी साजरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकरोड विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करताना शासनाच्या वतीने व काही संघटनांच्या वतीने रायगडावर ढोल वाजवून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. निवेदनावर मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, उपजिल्हाप्रमुख संतोष सहाणे, शहर उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, विनायक पगारे, सचिन चव्हाण, विलास कदम, उमेश भोई, श्याम गोहाड, नितीन धानापुणे, संदीप आहेर, सोनू आंधळे, रवि जाधव, प्रमोद साखरे, प्रशांत बारगळ, सागर दाणी आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी असताना काही विकृतांनी ढोल वाजवून पुण्यतिथी साजरी केल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा मनसे निषेध करत असून, ढोल वाजवून पुण्यतिथी साजरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
‘ढोल वाजविणाऱ्यांवर कारवाई करावी’
By admin | Published: April 14, 2017 12:51 AM