नि वडणुका म्हटल्या की बहुतांशी लोकांचा जणूकाही पैसे उकळण्याचा उद्योगच असतो. या काळात पैसे कसे कमवावेत त्याचे नानाविध फंडे त्यांच्याकडे तयार असतात. काहीही निमित्त सांगून ते पैसे पदरात पाडतात आणि रात्रीच्या खाण्या-पिण्याची सोय करतात. काहीजण तर आपल्या मतदारसंघातील सर्वच उमेदवारांकडे जाऊन विरोधकांच्या बित्तंबातम्या पुरवितात व त्यांना अशा काही सूचना करतात की त्यांनाही वाटावे हाच आपला खरा विश्वासू कार्यकर्ता; पण त्याला बिचाऱ्याला कोठे ठाऊक की, हा बनेल कार्यकर्ता सकाळी महायुतीच्या प्रचारसभेत, दुपारी बंडखोराच्या रॅलीत तर संध्याकाळी आघाडीच्या मांडवात असतो ते ! कोणताही उमेदवार हा तसा मुरलेलाच असतो; परंतु निवडणूक काळात त्याला इच्छा नसताना सर्वांचे ऐकूनच घ्यावे लागते. दिवसभरात त्यांना नानातºहेच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागते. जो भेटतो, तो चुना लावणाराच असतो. यासाठी एका उमेदवाराने ‘अर्थ’ खाते कुटुंबातील सदस्याकडेच ठेवले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे खरा आणि भुरटा कार्यकर्ता ओळखण्यासाठी अजब अशी शक्कल त्यांनी लढविली आहे. कार्यकर्ता दिवसभर खरोखर आपल्याच प्रचारात होता की नाही, यासाठी प्रचारातील पुराव्याचे मोबाइलवर ‘दर्शन’ घडविल्यावाचून त्यांच्या मनातील संभ्रम दूर होत नाही. शंकानिरसन झाले तरच हातावर बिदागी टेकविली जाते, आहे की नाही गंमत?
पुरावा दाखवा, बिदागी घ्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:59 AM
नि वडणुका म्हटल्या की बहुतांशी लोकांचा जणूकाही पैसे उकळण्याचा उद्योगच असतो. या काळात पैसे कसे कमवावेत त्याचे नानाविध फंडे त्यांच्याकडे तयार असतात. काहीही निमित्त सांगून ते पैसे पदरात पाडतात आणि रात्रीच्या खाण्या-पिण्याची सोय करतात.
ठळक मुद्देभटक्या