केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाषा सभ्य नव्हतीच, तिचे समर्थन होणार नाही म्हणून त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे स्वागत केले. मग छत्रपतींच्या घराण्यावर काठी उगारण्याची भाषा कुठल्या सभ्येतत बसते? नारायण राणे यांच्याप्रमाणेच राज्य सरकार वडेट्टीवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे धाडस सरकार दाखविणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विजय वडेट्टीवार नेहमीच बेताल वक्तव्य करीत असल्याचा आरोप करतानाच ते काँग्रेस पक्षाला रसातळाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देतानाच काँग्रेसमधील मराठा समाजाचे नेतेही त्यांना विरोध करीत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचीच भूमिका मराठा समाजाच्या विरोधात आहे, असे समजायचे का? असा सवालही यावेळी उपस्थित मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांच्यासह सचिन पवार, प्रमोद जाधव, आशिष हिरे, चेतन शेलार, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, योगेश गांगुर्डे, दिनेश नरवडे, कल्पेश पाटील, भारत इंगळे, आदी उपस्थित होते. बंटी भागवत यांनी आभार मानले.
विजय वडेट्टीवारांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:32 AM