सप्तशृंगगड : श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर श्रीमद् भागवत कथेची शोभा यात्रा काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्व कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी श्री महंत विष्णूदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले होते .गेल्या आठ दिवसांपासून या महायज्ञाला उज्जैन, गूजरात, आयोध्या, सूरत,ग्वाल्हेर, होशागांबाद,हरीद्वार, त्र्यंबकेश्वर, ओकांरेश्वर, शिवपूरी, कोटा ,वाशिम, राजस्थान, रतलाम, आदी ठिकाणचे संत महंत यांनी या आठ दिवसात या कार्यक्र मासाठी हजेरी लावली. या कार्यक्र माची सागंता झाल्याने सायंकाळी ६वाजता पहील्या पायरी पासून बॅडं व ढोल ताशांच्या गजरात सुमारे १५०साधूंच्या उपस्थितीत ध्वजाची व लहान मूलांनी शकंर,पार्वती, व राधा ;कृष्ण चा वेष परीधान करून सपूंर्ण गावातून मिरवणुक काढण्यात आली.यावेळी साधू महंताणी तलवार बाजी,दानपट्टा,गदा असे प्रकारचे खेळ सादर करत बोल सियावर रामचंद्र की जय, जय श्री राम, जय माता दी ,च्या घोषणा देत सपूंर्ण गड दाणाणून टाकले होते तसेच गावातील महीलांनी साधू महंताचे पूजा करून औक्षण करण्यात आले.त्यांची आरती करण्यात आली मोठ्या प्रमाणावर साधू महंत आल्याने सप्तशृंगगडावर जणू कूभमेळा भरला की काय अशा प्रकारचे वातावरण येथे पहायला मिळाले. या मिरवणूकी मध्ये ग्रामस्थ व भाविकांनी स्वयंस्फूर्तीने सामील होऊन साधू सतांंबरोबर नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते
सप्तशृंगगडावर श्रीमद् भागवत कथेची शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:26 PM
सप्तशृंगगड : श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर श्रीमद् भागवत कथेची शोभा यात्रा काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्व कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी श्री महंत विष्णूदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले होते .
ठळक मुद्देयावेळी साधू महंताणी तलवार बाजी,दानपट्टा,गदा असे प्रकारचे खेळ सादर करत बोल सियावर रामचंद्र की जय, जय श्री राम, जय माता दी ,च्या घोषणा देत सपूंर्ण गड दाणाणून टाकले होते तसेच गावातील महीलांनी साधू महंताचे पूजा करून औक्षण करण्यात आले.