नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासी वाहतुकीतून एसटी महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. परंतु यंदा कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाला हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.श्रावण महिन्यात येणाºया सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. जिल्ह्यासह देशातील कानाकोपºयातून भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शन तसेच फेरीसाठी येत असल्याने एसटी महामंडळाकडून दरवर्षी विशेष बसेसचे नियोजन केले जाते. विशेषत: पहिल्या आणि तिसºया श्रावणी सोमवारचे एसटीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. या काळात खासगी वाहनांना प्रतिबंध केला जातो. त्यामुळे भाविकांना एसटी बसनेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे साहजिकच महामंडळाच्या उत्पन्नात भर पडते. परंतु यंदा महामंडळासाठी श्रावण महिना कोरडाच जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद आहे. तसेच धार्मिक विधी सोहळ्यावरदेखील निर्बंध असल्याने भाविकांसह साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. दरवर्षी उसळणारी गर्दी यंदा होणार नसल्याने त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरदेखील होणार आहे. त्र्यंबकेश्वरसाठी दरवर्षी महामंडळाकडून ३०० ते ३५० बसेसचे नियोजन केले जाते. नाशिकहून जव्हार फाट्यापर्यंत बसेस सोडल्या जातात तसेच खासगी वाहनांतून केवळ तळेगावपर्यंतच मुभा असल्याने तळेगाव ते त्र्यंबकेश्वर अशादेखील बसेस सोडल्या जातात. एकूणच संपूर्ण भाविकांची वाहतूक महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातूनच केली जाते. त्यामुळे एसटीला चांगले उत्पन्न मिळते.शहरातून भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मागीलवर्षीपासून तर नाशिकरोड, निमाणी, सिडको ेयथूनही त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सोडण्यात आल्या होत्या. ईदगाह मैदानात तातत्पुरत्या स्वरूपात डेपो उभारून त्र्यंबकेश्वरसाठी प्रवासी वाहतूक केली जाते. यंदा यातील काहीच होणार नसल्याने महामंडळाला हक्काचे उत्पन्नदेखील यंदा घेता येणार नाही.
एसटी महामंडळाला यंदा श्रावण ‘कोरडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:10 AM