शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

व्रतवैकल्य सणांचा श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:24 PM

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.‘श्रावण मासी हर्ष मानसी...’ असा सर्वांना आनंद देणारा श्रावण मास धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला सणांचा असेही म्हटले जाते. कारण यातील प्रत्येक दिवस हा एकप्रकारे सण-उत्सवाचा असल्याने यात धार्मिक विधी व व्रतवैकल्य केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. त्यातच नाशिकनगरी तीर्थक्षेत्र असल्याने श्रावण मासात दर सोमवारी शिवापूजन, तर मंगळवार मुली मंगळागौरीची पूजा करतात व गुरु वारी गुरुचरित्राचा पाठ, तर शुक्र वारी श्री लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी शनिदेवाला नारळ फोडतात .रविवारी आदित्याची(सूर्याची) पूजा, तर नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण अष्टमी असे म्हणतात. या महिन्याच्या अमावास्येला पिठोरी अमावस्या व्रत करतात व याच दिवशी शेतकरी पोळा सण साजरा करतात.विशेष म्हणजे श्रावणात चातुर्मासाचे महत्त्व आहे, प्रत्येक वर्षातील अशा शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळात चातुर्मास असे म्हटले जाते. चातुर्मास काळात व पुण्यसंचय करण्याचा काळ मानला जातो. या काळात सर्व समुद्र नदी तलाव आदी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. चातुर्मासात येणारा श्रावण मास अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जातो. या काळात घरोघरी शिवलिंगाची पूजा करतात. तसेच मंदिरांमध्येदेखील धार्मिक विधी होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. परंतु कोरोनामुळे हा सणदेखील सोशल मीडियावर साजरा होईल, असे दिसून येते. नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे, परंतु या दिवशीदेखील महिलांना घराबाहेर पडता येणे शक्य नाही. यंदा शहरातील अनेक मंडळांनी दहीहंडीचा उत्सवदेखील रद्द करण्यात आलेला आहे.------------प्रत्येक श्रावणी सोमवार शिवपूजन करण्याची प्रथा असून, याच महिन्यात अनेक सण उत्सव येत असल्याने एकप्रकारे धार्मिक पर्वणीच असते. या महिन्यात बहुतेक दिवशी काही ना काही धार्मिक कृत्य सांगितले आहे. परंतु, यंदा भाविकांनी सर्व सण, उत्सव घरीच साजरे करावेत, मंदिरात गर्दी करू नये.- रवींद्र पैठणे, वैदविद्या व धार्मिक अभ्यासक

टॅग्स :Nashikनाशिक