नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.‘श्रावण मासी हर्ष मानसी...’ असा सर्वांना आनंद देणारा श्रावण मास धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला सणांचा असेही म्हटले जाते. कारण यातील प्रत्येक दिवस हा एकप्रकारे सण-उत्सवाचा असल्याने यात धार्मिक विधी व व्रतवैकल्य केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. त्यातच नाशिकनगरी तीर्थक्षेत्र असल्याने श्रावण मासात दर सोमवारी शिवापूजन, तर मंगळवार मुली मंगळागौरीची पूजा करतात व गुरु वारी गुरुचरित्राचा पाठ, तर शुक्र वारी श्री लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी शनिदेवाला नारळ फोडतात .रविवारी आदित्याची(सूर्याची) पूजा, तर नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण अष्टमी असे म्हणतात. या महिन्याच्या अमावास्येला पिठोरी अमावस्या व्रत करतात व याच दिवशी शेतकरी पोळा सण साजरा करतात.
श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 6:38 PM
नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या ...
ठळक मुद्देमठ, मंदिरे बंद धार्मिक उत्सवांवर कोरोनाचे सावट